अजय कुमार भट्ट
संचालक (प्रणाली)

श्री. अजयकुमार भट्ट यांनी १९७९ मध्ये अहमदाबाद येथून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी मधे पदवी घेतली असून अंतिम परिक्षेत त्यांनी विद्यापीठामध्ये दुसरा क्रमांक पटकावला होता. त्यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था आय आय टी मुंबई मधून एम.टेक. (संपर्क अभियांत्रिकी) अभ्यासक्रम १९८१ मध्ये पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून १९९५ मध्ये परिचालन अभियांत्रिकी पदव्युत्तर पदविका प्राप्त केली. FIETE, MCSI, MIRSTE अशा व्यवसाय संस्थांशी त्यांचा संबंध आला असून ते भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत.
श्री. भट्ट भारतीय रेल्वे सेवा–संकेत अभियांत्रिकी सेवेतील अधिकारी असून १९८०च्या तुकडीचे अधिकारी आहेत. त्यांना रेल्वेतील विना अपघात सेवेचा (१५ वर्षे भारतीय रेल्वे व १७ वर्षे कोकण रेल्वे) मोठा अनुभव असून विविध रेल्वे खात्यांमध्ये रेल्वे प्रणालीच्या एकत्रीकरणाचे व्यवस्थापन, नाविन्यपूर्ण आरेखने व अभियांत्रिकी उकल याद्वारे आगगाड्याच्या परिचालनामध्ये सुरक्षितता वाढवणे, महत्वाची चर्चा व व्यवसाय नियोजन व विकास, निविदा, कंत्राटे, इत्यादी बाबतीत अनुभव आहे.
भारतीय रेल्वेमध्ये माहिती आणि तंत्रज्ञान ह्या विषयांमध्ये नवनवीन प्रयोग करणे, अपघात विरोधी यंत्रणेवरील प्रकल्प पूर्ण करणे, रेल्वे विद्युतीकरण प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या प्रकल्पाचे कार्यान्वयन आणि देखभाल इत्यादी कामे त्यांनी पुढाकार घेऊन केली आहेत. भारता प्रमाणेच परदेशात लाईट रेल ट्रान्झीट प्रणाली व मेट्रो रेल्वे मध्ये ही त्यांनी काम केले आहे.
सध्या, मुंबई मेट्रो -३ प्रकल्पाची अंमलबजावणी करत असताना 'मेक इन इंडिया' उपक्रमा अंतर्गत 'माफक दारात आरामदायक प्रवास ' आणि विश्वसनीय,शाश्वत, सुरक्षित आणि कार्यक्षम मेट्रो रेल्वे प्रणालीची समजंसपणाने निवड हे त्यांचे लक्ष्य आहे.