
‘उगवता सूर्य’ हे आमच्या संस्थेचे परिचय चिन्ह आहे. मुंबईमध्ये येऊ घातलेल्या उत्तम, सुरक्षित व विश्वसनीय परिवहन जाळ्याचा तो निदर्शक आहे. आपली विविधता सतत जपणाऱ्या या शहरातील लोकांच्या आशा व आकांक्षांचा हा उगवता सूर्य प्रतिनिधित्व करतो.
तो नव्या परिवहन जाळ्याचे प्रतिनिधित्व करत असून शहरातील परिवहनाच्या नवीन साफल्याचे प्रतिक ठरतो. मुंबई मेट्रो -३ प्रकल्पाचा तो निदर्शक आहे.
मुंबई मेट्रो -३ चे कार्यान्वयन झाल्यानंतर रोजच्या प्रवासातील गैरसोयी संपलेल्या असतील. त्यानंतर अनुभवास येणारा प्रवास हा जणू नव्या पहाटे सारखा असेल. परिचय चिन्हातील विविध रंग मुंबई शहरातील विविध अंगांना निर्देशित करत आहेत. मुंबई शहर हे अनेकानेक संधी उपलब्ध करून देणारे शहर म्हणून ओळखले जाते. याचसाठी देशभरातील लोक मुंबईत एकत्र जमतात. याच वैविध्यतेतील एकतेचे प्रतिनिधित्व हे रंग करतात.
एक उत्तम रीतीने जोडले गेलेले परिवहनाचे जाळे ही मुंबई साठी काळाची गरज आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन आरामदायी सुरक्षित, नियमित आणि विश्वसनीय मेट्रो रेल सेवा देण्यास कटिबद्ध आहे. शहराच्या सार्वजनिक परिवहन प्रणाली मध्ये एका नव्या पहाटेची आम्ही सुरवात करू.
आमचा उगवता सूर्य आम्हाला आमच्या ध्येयाची आठवण करीत राहील!
Multi Colors Diversity in India

Rays of the Rising Sun

Multiple Corridors
